Wednesday 17 February 2021

राज्यात प्रत्येकाने हे नियम पाळा, अन्यथा कारवाई होईल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा इशारा राज्यात प्रत्येकाने हे नियम पाळा, अन्यथा कारवाई होईल.


मास्क न घालणाऱ्यांना दंड करायलाच हवा जे लोक मास्क घालत नाहीत  किंवा आरोग्याचे नियम पाळत नसतील. पोलीस प्रशासनाने अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक कारवाई केलीच पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले जिथे कंटेन्मेंट आवश्यक आहे. तिथे ते करा व त्याची अंमलबजावणी करा, एखादा कोरोना रुग्ण सापडला तर ,एकेका रुग्णांचे किमान २० तरी संपर्क शोधा. लग्नसमारंभ, लोकांच्या गाठीभेटी, पार्ट्या व इतर सामाजिक कार्यक्रमात आरोग्यविषयक नियम पाळले जात नसतील तर कारवाई होणार.

उपाहारगृह, हॉटेल्समध्ये नियमांचे पालन होत नसल्याचे आढळून आल्यास परवाना रद्द होणार. राज्यात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेला 31 मार्चपर्यंत किंवा 2 महिने मुदतवाढ देण्यात येईल.

कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमासाठी आता पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल. तसेच सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंचे पालन होत नसल्यास कारवाई होणार. तसेच विवाह समारंभासाठी पोलिस परवानगी आवश्यक आहे. महत्वाचे म्हणेज ज्या विवाह किंवा इतर समारंभात मास्क व इतर नियम पाळलेले दिसणार नाहीत त्या हॉल्स किंवा सभागृहांचे परवाने हि रद्द होतील.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचना ह्या ,  प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाच्या आहेत. आपण थोडासा वेळ काढून इतरांना देखील शेअर करा.