Saturday 30 January 2021

आयुक्त अविनाश ढाकणे यांनी वाहन परवान्याबाबत दिल्या महत्वपूर्ण सूचना.

राज्यातील वाहन परवान्याबाबत परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी दिल्या महत्वपूर्ण सूचना.

याआधी खासगी वाहन आणि मालवाहतुक किंवा प्रवासी वाहतूक यासाठी वेगवेगlळा चालक परवाना अनिवार्य होता. मात्र, आता एका याचिकेच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. एकाच चालक परवान्यावर मालवाहतूक आणि खासगी वाहतूक तसेच प्रवासी वाहतूक सुद्धा करता येणार आहे. मात्र प्रवासी वाहतुकीसाठी फक्त बॅच बिल्ला अनिवार्य राहणार आहे.

केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यावर आदेश दिले. त्यानंतर याबाबत आता राज्य परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी परिपत्रक जाहीर केले आहे. यामध्ये त्यांनी प्रवासी वाहतूक वगळता इतर कोणत्याही चारचाकी वाहनांसाठी, आता हलक्या मोटार वाहनांचा परवाना असणे पुरेसा आहे असे स्पष्ट केले आहे.

 दरम्यान यासबंधीच्या सूचना जाहीर करण्याचे आदेशहि, त्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत.  तशी वाहन परवान्याबाबत आणखी काही माहिती आली-तर ती आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू. दरम्यान राज्यात आता प्रवासी वाहतूक वगळता इतर कोणत्याही चारचाकी वाहनांसाठी, आता हलक्या मोटार वाहनांचा परवाना असणे पुरेसे असणार आहे.