Wednesday, 3 March 2021

LPG सिलिंडरसंदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय ऑयल सेक्रेटरी तरुण कपूर

LPG सिलिंडरसंदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय.



तुम्हाला माहिती असेल एलपीजी कनेक्शन मिळविण्यासाठी रहिवासी दाखला सर्वात महत्त्वाचा  आहे. त्याशिवाय एलपीजी सिलिंडर मिळविणे कठीण असते. मात्र आता या नियमध्ये बदल होणार आहे.  काल म्हणजे (2 मार्च 2021) रोजी देशाचे ऑयल सेक्रेटरी तरुण कपूर यांनी याविषयीची सविस्तर माहिती दिली. 


त्यांनी सांगितले एलपीजी कनेक्शन मिळविण्यासाठी रहिवासी दाखला सर्वात महत्त्वाचा असते. मात्र अनेकांकडे हा दाखला नाही आणि गावाममध्ये तो तयार करणं कठीण आहे. यावर मात करण्यासाठी सरकार रहिवाशाचा पुरावा नसतानाही कनेक्शन देण्याचा विचार करीत आहे. तसेच नव्या नियमानुसार, एकाच डीलर्सकडून तीन सिलिंडर गॅस बुक करण्याची आता ग्राहकांना सुविधा दिली जाणार आहे.

ही माहिती वाचा: राज्यात प्रत्येकाने हे नियम पाळा, अन्यथा कारवाई होईल

नंबर लावूनही सिलिंडर लवकर उपलब्ध होत नाही. मात्र सुविधेनंतर आपण आपल्या आसपासच्या तीन डीलर्सकडून समान पासबुकद्वारे गॅस घेण्यास सक्षम असाल असे ऑयल सेक्रेटरी तरुण कपूर म्हणाले.  तशी याविषयी आणखी काही माहिती आली तर ती आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू .