Sunday 17 January 2021

CET सेलकडून जात प्रमाणपत्र देण्यासाठी मुदतवाढ

CET सेलकडून जात प्रमाणपत्र देण्यासाठी मुदतवाढ 

सीईटी सेलकडून अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए, आर्किटेक्‍चर, एमटेक, एम आर्च, हॉटेल मॅनेजमेंट यासह इतर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.मराठा आरक्षणास स्थगिती आल्यामुळे या  प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खुला किंवा "इडब्ल्यूएस' प्रवर्गातून अर्ज भरावे लागत आहे. त्यामुळे CET सेलकडून मुदतवाढ मिळणार आहे. 

CET सेलने सांगितलॆ , ज्यांनी जात पडताळणी, इडब्ल्यूएस आणि एनसीएल या तीन प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पावती. ऑनलाइन अर्ज करताना सोडलेली आहे. अशा विद्यार्थ्यांना , आता मूळ प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 20 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 

प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक 18 जानेवारी रोजी www.mahacet.org या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. CET सेलकडून  मुदतवाढ मिळत आहे, हि माहिती विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी नकीच महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा.

काही दिवसा पूर्वी अभियांत्रिकी, फार्मसी, एमबीए, आर्किटेक्‍चर, एमटेक, मेरीट लिस्ट जाहिर करण्यात आली आणि कैप राउंड ची पहिली फेरी झाली. आता विद्यार्थी त्याच्या कॉलेज मधे जाऊन ऐडमिन घेत आहेत. तर काही विद्यार्थीना ऐडमिन घेण्यासाठी अडचण येत आसल्याने ही मुदत वाढउन देण्यात आली आहे.