Sunday 24 January 2021

शेतकऱ्यांना आता महिन्याला केवळ ५० बॅगच खत

शेतकऱ्यांना आता महिन्याला केवळ ५० बॅगच खत खरेदी करता येईल

यापूर्वी खतांची खरेदी अमर्यादित केली जायची मात्र. आता शेतकऱ्यांना खत खरेदीसाठी दरमहा ५० बॅगची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. केंद्र शासनाने हा निर्णय घेतला आहे. तर रसायन व उर्वरक मंत्रालयाचे  डीबीटी संचालक निरंजन लाल यांनी २१ जानेवारीला याबाबतचे पत्रक जारी केले आहे.

तुम्हाला माहिती असेल यापूर्वी खतांची खरेदी अमर्यादित केली जायची. दरम्यान अनेक वेळी शेतकरी कुटुंबातील दोनपेक्षा जास्त सदस्यांच्या नावावर शेती असायची मात्र एकाच व्यक्तीच्या नावावर खत खरेदी व्हायची. म्हणजे यामुळे रेकॉर्डला एकाच व्यक्तीच्या नावावर मोठ्या प्रमाणात खत खरेदी केल्याचे दिसत होत.

आता केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार एका शेतकऱ्याला आधारकार्डनुसार केवळ ५० बॅग खताची खरेदी महिन्याला करता येणार आहे. म्हणजे साधारण २५ ते ३० हजार रुपयांपर्यंत खत शेतकऱ्याला खरेदी करता येणार आहे. तसेच आता शेतकऱ्याचा अंगठा पॉस मशीनवर लावून खताची विक्री होणार आहे. तसे याविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही लकरच तुमच्या पर्यंत पोहचवू.

ही माहिती वाचा: 27 जानेवारीपासून राज्यात सुरु होणार 5वी ते 8वी चे वर्ग

शेतकऱ्यांच्या खत खरेदीवर आता मर्यादा बसणार आहे. हि माहिती प्रत्येक शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे. आपण थोडासा वेळ काढून , इतरांना देखील अवश्य शेअर करा.