Saturday 16 January 2021

27 जानेवारीपासून राज्यात सुरु होणार 5वी ते 8वी चे वर्ग

२७ जानेवारीपासून राज्यात सुरु होणार 5वी ते 8वी चे वर्ग



राज्यातील  पाचवी ते आठवीचे वर्ग येत्या २७ जानेवारीपासून सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. 

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले कि वर्ग सुरू करताना यासाठी पालकांची संमती घेतली जाईल.  तसेच संसर्गापासून बचावासाठी खबरदारी म्हणून राज्यातीलसर्व शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी केली जाईल. या संबंधीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जारी करण्यात येतील असेही राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे. दरम्यान याविषयीची आणखी माहिती आली तर ती आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत पोहचवू. 

राज्यात २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होत आहेत. हि माहिती विद्यार्थी आणि पालकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे, आपण थोडस सहकार्य करा , इतरांना देखील शेअर करा. 

9 वी ते 10 वी च्या शाळा काही दिवसापूर्वी सुरु करण्यात आल्या. काही विद्यार्थीनी आपला अभ्यासक्रम हा ऑनलाइन पद्धत ने पुर्ण केला. पण काही विद्यार्थीना अडचणी आले. या आडचनी दुर करण्यासाठी 9वी आणि 10 वी च्या शाळा लवकर सुरु करण्यात आल्या.

कॉलेज कधी चालू होणार?

कॉलेज कधी चालू होणार हा प्रश्न सगळयाना च पडला असेल परतू याचे उत्तर कोणाकडेच नाही. पण तुम्हाल या प्रश्नच उत्तर लवकर मिळणार आहे. 20 जानेवारीला शिक्षण मंत्री उदय सामंत काही माहिती देणार आहेत कॉलेजे विषयी.