Sunday 10 January 2021

स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेने FD व्याज दरात केली वाढ

(SBI) स्टेट बँक ऑफ इंडियाने,बँकेने FD व्याज दरात केली वाढ


देशातील सर्वात मोठी सरकारी बँक(SBI) स्टेट बँक ऑफ इंडियाने. FD वरील म्हणजे म्हणजे फिक्स्ड डिपॉजिटवरील व्याज दरांत वाढ केली आहे. बँकेने एक ते दोन वर्षांपेक्षा कमी एफडीच्या व्याजावर 10 बेसिस पॉईंटपर्यंत वाढ केली आहे. तर  नवीन व्याज दर 8 जानेवारी 2021 पासून लागू झाले आहेत, असे बँकेने स्पस्ट केले. 


कसे आहेत नवे व्याज दर ?

SBI ने दिलेल्या माहिती प्रमाणे आता 7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 2.9 टक्क्यांनी व्याज मिळेल. 180 दिवस ते 1 वर्षाहून कमीच्या एफडीवर 4.4 टक्क्यांच्या दराने व्याज मिळेल. तसेच 211 दिवस ते 1 वर्षाहून कमी च्या एफडीवर 4.4 टक्के आणि 1 वर्ष ते 2 वर्षाहून कमीच्या एफडीवर 5 टक्के व्याज दिलं जाईल.

याप्रमाणेच 2 ते 3 वर्षांहून कमीच्या एफडीवर 5.1 टक्के, 3 ते 5 वर्षापर्यंतच्या एफडीवर 5.3 टक्के. तसेच 5 वर्ष आणि 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर 5.4 टक्के दराने व्याज दिलं जाईल. स्टेट बँक ऑफ इंडियाने फिक्स्ड डिपॉजिटवरील व्याज दरांत वाढ केली आहे. हि माहिती बँकेच्या प्रत्येक ग्राहकांसाठी खूप महत्वाची आहे.