Friday 15 January 2021

केंद्र सरकारकडून लसीकरणासाठी नियमावली जाहीर.

केंद्र सरकारकडून लसीकरणासाठी नियमावली जाहीर.

देशात उद्या शनिवार १६ जानेवारी पासून करोना लसीचे  लसीकरण होणार आहे. या मोहिमेचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. 

उद्या को-विन’ अ‍ॅपचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होईल- दरम्यान आरोग्य क्षेत्रातील जवळपास तीन कोटी कर्मचाऱ्यांना सुरुवातीला लस टोचण्यात येईल. लसीकरणासाठी १८ पेक्षा जास्त वय असलेल्यांनाच , यामध्ये सहभागी होता येईल. तसेच स्तनपान करणाऱ्या मातांचं लसीकरण करु नये असं केंद्राकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान यालसीचे २८ दिवसांच्या अंतराने दोन डोस घ्यावे लागतील.

पोलिओ लसीकरणाच्या वेळापत्रकामध्ये बदल झाले ?

ही जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असेल. त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने १७ जानेवारीला होणाऱ्या पोलिओ लसीकरणाच्या वेळापत्रकामध्ये बदल केला आहे. दरम्यान पोलिओ लसीकरण आता ३१ जानेवारीला होणार असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले.