Friday 8 January 2021

Jee Advance Exam ३ जुलैला होणार व काही महत्त्वाचे निर्णय

Jee Advance Exam ३ जुलैला होणार, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची महत्वाची घोषणा.



केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षेच्या तारखेची घोषणा केली आहे. 3 July 2021 रोजी जेईई ऍडव्हान्स्डची परीक्षा होणार आहे.

 काय म्हणाले केंद्रीय शिक्षण मंत्री ?

केंद्रीय शिक्षण मंत्री म्हणाले, आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी, यावर्षी जेईई ऍडव्हान्स्ड परीक्षेसाठी ७५ टक्क्यांची पात्रता नसेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना मदत होईल. यंदा आयआयटी खरगपूर यावेळेस परीक्षेचं आयोजन करेल तर ३ जुलै २०२१ रोजी हि परीक्षा होणार आहे.

तसेच जेईई मेन्स परीक्षेचे पहिले सत्र 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी 2021 या कालावधीत घेण्यात येईल, असे त्यांनी संगितले. केंद्री शिक्षणमंत्र्यांनी काल म्हणजे 7 जानेवारीला दिलेली हि माहिती - विद्यार्थी आणि पालकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे. आपण थोडा वेळ काढून, इतरांना देखील अवश्य शेअर करा.

Jee Main परीक्षा मधे प्रश्न विचारण्याची पद्धत बदलेल.

जेईईमध्ये पूर्वीसारखेच प्रश्न विचारले जातील. परंतु पूर्वी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितामध्ये प्रत्येकी 25 प्रश्न विचारले गेले होते. आतापासून प्रत्येक विषयाचे 30 प्रश्न दोन भागात दिले जातील. पहिल्या भागात 20 प्रश्न असतील तर दुसर्‍या भागात 10 प्रश्न असतील. आता विद्यार्थ्यांनाही दुसरा भागात दहापैकी पाच प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.

Jee Main परीक्षा 13 भाषान मधे.

आता jee Main परीक्षा ही 13 भाषान मधून होणार हे तुम्ही कदाचीत  या बदल वाचले असेल. तथापि, आपण हे समजले पाहिजे की जेईई परीक्षा आतापर्यंत इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषेत घेण्यात येत होती. परंतु आता ते 13 भाषांमध्ये असेल. यात इंग्रजी, हिंदी, गुजराती, उर्दू, पंजाबी आणि मराठी व इतर बर्‍याच राज्यांतील 13 भाषांचा समावेश असेल.