FASTag वर मिळणार ५ टक्के कॅशबॅक
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने फास्ट टैग वर 5% कॅशबॅक मिळणार हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महामंडळाच्या देखरेखेतील यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच राजीव गांधी सागरी सेतू पथकर नाक्यांवर फास्टॅगधारक वाहनांना ५ टक्के कॅशबॅक दिला जाणार ११ जानेवारी २०२१ ला नव्या योजनेला सुरुवात होणार आहे.
काय आहे हि योजना?
५ टक्के कॅशबॅक रक्कम वाहनधारकाच्या फास्टॅग बँक खात्यात महामंडळामार्फत थेट जमा होईल. यामधे कार, जीप व एसयूव्ही वाहनधारकांसाठी हि योजना लागू केली असेल. असे सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतलेला हा निर्णय वाहनधारकांसाठी नक्कीच खूप महत्वाचा आहे. आपण इतरांना देखील शेअर करा.