Thursday 7 January 2021

पोलीस भरतीचा जीआर रद्द करण्यात आला, गृहमंत्र्यांची घोषणा

पोलीस भरतीचा जीआर रद्द करण्यात आला गृहमंत्र्यांची मोठी घोषणा

गृहमंत्री आज पोलीस भरती बाबत शुद्धी परिपत्रक जारी करणार होते. दरम्यान आता पोलीस भरती बाबत,  गृहविभागाने काढलेला जीआर आता रद्द करण्यात आला आहे. अशी माहिती आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

तुम्हाला माहिती असेल गृह विभागाने काढलेल्या जीआरनुसार एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना पोलीस भरती मध्ये खुल्या प्रवर्गातून घेण्यात येईल असा उल्लेख केला होता. या जीआर ला विरोध झाल्यानंतर आता गृहविभागाने हा GR रद्द केला आहे. राज्याचे गृहमंत्री पुढे म्हणाले , 2019 च्या पोलीस भरती मध्ये ज्या उमेदवारांनी  एसईबीसी मधून अर्ज केले होते. त्यांना 23 डिसेंबर 2020 च्या शासन निर्णयाचा लाभ देण्यासाठी. लवकरच सुधारित शासन निर्णय जारी करण्यात येईल. दरम्यान या विषयी काही माहिती प्राप्त झाली तर ती आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू.  

राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलेली हि माहिती पोलीस भरती देणाऱ्या प्रत्येक उमेदवारांसाठी हि माहिती खरोखर खूप महत्वाची आहे. आपण थोडस सहकार्य करा,  इतरांना देखील अवश्य शेअर करा.