Friday 8 January 2021

Paytm App वर मिळेल 2 लाखांचे कर्ज पेटीएम ने दिली नवीन माहिती

Paytm वर मिळेल 2 मिनिटांत 2 लाखांचे कर्ज पेटीएम चे नविन अपडेट.


छोट्या उद्योजकांसाठी महत्वाची बातमी Paytm वर मिळेल 2 मिनिटांत 2 लाखांचे कर्ज. आपण काही दिवसापूर्वी लोन घेण्यासाठी, काय पात्रता असायला पाहिजे याची माहिती घेतली होती, दरम्यान आज आपण लोन देणाऱ्या पेटीएम कंपनीबद्दल जाणून घेऊ. पेटीएमने इन्स्टंट पर्सनल लोन देण्यासाठीची योजना आणली आहे.


हे कर्ज कोणाला मिळणार?

पगारधारक, छोटे व्यापारी किंवा व्यावसायिकांना हे कर्ज मिळेल. दरम्यान या सेवेमुळे ग्राहकांना 2 मिनिटांत कर्ज मिळेल असेहि कंपनीने सांगितले.


Paytm चे हे कर्ज (CR)क्रेडिट स्कोअर आणि शॉपिंगच्या पॅटर्नवर आधारित असेल. हे कर्ज NBFC आणि बँकांच्या माध्यमातून दिले जाईल. पेटीएम देत असलेल्या कर्जाचा.  अर्ज भरण्यापासून ते कर्ज वितरणापर्यंतची सर्व प्रक्रिया डिजिटल आहे. यामध्ये कोणतीही कागदपत्रं प्रत्यक्ष द्यावी लागत नाहीत. पेटीएमच्या नव्या तंत्रज्ञानामुळे, बँकाची कर्ज देण्याची प्रक्रिया दोन मिनिटात पूर्ण होईल. कंपनीनं यासाठी अनेक बँका आणि वित्तीय संस्थांशी भागीदारी केली आहे, असे पेटीएम ने स्पस्ट केले.


इच्छुक ग्राहक आपल्या Paytm aaps च्या फायनान्शियल सर्व्हिस सेक्शनमध्ये जाऊन. Personal Loan टॅबवर क्लिक करुन पुढची प्रक्रिया पूर्ण शकतात. सुरवातीला  बीटा फेजच्या दरम्यान कंपनीने 400 निवडक ग्राहकांना कर्ज दिले आहे. दरम्यान छोट्या व्यावसायिकांना कर्ज देणाऱ्या आणखी काही विश्वासू कंपन्यां बद्दल नवीन अपडेट आले तर ते आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू.


Paytm च्या माध्यमातून आपण 2 लाखाचे कर्ज घेऊ शकता , हि माहिती छोट्या व्यावसायिकांसाठी , खूप महत्वाची आहे ,आपण थोडा वेळ काढून इतरांना अवश्य शेअर करा.