Saturday 10 April 2021

MPSC ची ११ एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली

कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी सर्वात आधी भाजप खासदार नवनीत राणा यांनी केली. मनसे प्रमुख राज ठाकरे, महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्स झाल्यानंतर ११ एप्रिल रोजी होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. 

परीक्षेचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षेसाठी १०९ परीक्षा केंद्रांवर तयारी सुरू होती. हे काम परीक्षा पुढे ढकलल्यामुळे स्थगित करण्यात आले.

परीक्षा पुढे ढकल्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. परीक्षा फॉर्म भरतांनाचे विद्यार्थ्यांचे वय गृहित धरले जाणार असल्याने वयाची अडचण येणार नसल्याचे राज्य शासनाने सांगितले.

राज्य सरकारने शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस पूर्णपणे लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे परीक्षा 11 एप्रिलला होणारी परीक्षा होणार का ? असा प्रश्न उपस्थित झाला होता.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी - यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत काल  म्हणजे  10 एप्रिल रोजी बैठक पार पडली या बैठकीनंतर 11 एप्रिलला, होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

MPSC ची परीक्ष पुढे ढकलण्याचे निश्चित झाले. हि माहिती स्पर्धा परीक्षकांसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे. आपण इतरांना देखील शेअर करा.